रामटेकडी इंडस्ट्रीयल एरियातील घटना
marathinews24.com
पुणे – पोकलँड चालकाने बेदरकारपणे बकेटने धडक देउन कचरावेचक महिलेला ठार केले. ही घटना ११ मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास रामटेकडी इंडस्ट्रीयल एरियातील कचरा डेपोत घडली आहे. याप्रकरणी पोकलँड चालकाविरूद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरेखा सुभाष काळे (वय ३० रा. रामटेकडी, हडपसर) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोकलँड चालक अरविंद प्रभू पासवान (वय ३०, रा. रामटेकडी, हडपसर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुभाष प्रभाकर काळे (वय ३८) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरियातील कचरा डेपोत सुरेखा काळे कामाला होती. ११ मे रोजी दुपारी बाराच्या सुमारास कचरा डेपोत काम करीत असताना, पोकलँड चालक सुभाषने बेदरकापणे वाहन चालवून सुरेखाला बकेटने धडक दिली. गंभीररित्या जखमी झाल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वानवडी पोलिसांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत