पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई; ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई; ११ बांगलादेशी तरुणी ताब्यात

आठवडभरात दुसरी कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आठवडभरात पोलिसांनी वेश्यावस्तीत दुसरी कारवाई करुन २२ तरुणींना ताब्यात घेतले. त्यापैकी ११ तरुणी बांगलादेशी असल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. नुकतीच केलेल्या कारवाईत दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी या कारवाईत अमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला अटक केली होती. त्याच्याकडून चरस, तसेच इंजेक्शन जप्त केली होती.

भांड्याचा वाद जीवावर बेतला, दाम्पत्याने केला खून – सविस्तर बातमी 

बुधवार पेठेत बांगलादेशी तरुणी बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर फरासखाना आणि खडक पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. पोलिसांनी या भागातील कुंटणखान्याची तपासणी केली. पोलिसांनी संशयावरुन २२ तरुणीना ताब्यात घेतले. त्या पैकी ११ तरुणींनी ओळखपत्र, तसेच नागरिकत्वाची कागदपत्रे सादर केली. उर्वरित ११ तरुणींची चौकशी करण्यात आली. तेव्हा तरुणींनी बांगलादेशी असल्याची माहिती दिली. कागदपत्रांच्या तपासणीत त्या बांगलादेशी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फरासखाना पोलीस ठाण्याला भेट दिली.

बांगलादेशी तरुणी बुधवार पेठेत कशा आल्या. त्यांना दलालाने पुण्यात कसे आणले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी पोलिसांनी बुधवार पेठेत झाडाझडती घेतली होती. या कारवाईत पोलिसंनी जवळपास ७०० जणांची चौकशी केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी बुधवारी (१८ फेब्रुवारी) बुधवार पेठेत कारवाई केली.

बुधवार पेठेतील ज्या कुंटणखान्यात बांगलादेशी तरुणी सापडल्या. असे कुंटणखाने लाखबंद (सील) करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायद्यानव्ये गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. यापुढील काळात बुधवार पेठेत नियमित कारवाई करण्यात येणार आहे.

– अमितेशकुमार, पाेलीस आयुक्त, पुणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×