Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

सराइतांकडून पोलीस हवालदाराला मारहाण

तिघे जण अटकेत

marathinews24.com

पुणे – दंडात्मक कारवाई केल्याने सराइतांनी वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराला मारहाण केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा चौकात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली..

‘डीएसके’ प्रकरणातील ठेवीदारांची यादी संकेतस्थळावर – सविस्तर बातमी

लकी गौरव आनंद (वय २१), साहिल प्रकाश चिकणे, श्रावण रमेश हिरवे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार राजेंद्र सेंगर यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार सेंगर हे सिंहगड रस्ता वाहतूक शाखेत नियुक्तीस आहेत. आरोपी आनंद, चिकणे, हिरवे हे दुचाकीवरुन धायरी फाटा चौकातून मंगळवारी (३० डिसेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निघाले होते. एकाच दुचाकीवरुन तिघे जण प्रवास (ट्रिपल सीट) प्रवास करत असल्याने पोलीस हवालदार सेंगर यांनी त्यांना अडवले. सेंगर यांनी दंडात्मक कारवाई केली. दंडात्मक कारवाई केल्याने आरोपी चिडले आणि त्यांनी सेंगर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

आरोपी हिरवे याने सेंगर यांना चापट मारली. आरोपींनी आरडाओरडा करुन त्यांचा गणवेश फाडला. शासकीय कामात अडथळा आणणे, माराहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक मालुसरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×