Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

पोलीस मुलीचा शोध घेत नाही, दाम्पत्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

बीड एसपी ऑफीस समोरील घटना

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी मुलीच्या आई- वडिलांनी पिंपळनेर पोलिसांसह जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयाचे उंबरे झिजवले. मागील सात महिन्यांपासून गायब असलेल्या मुलीला पोलीस शोधून देत नाहीत. तपासी अधिकारी जाणीवपुर्वक मुलीला शोधत नाहीत, असं म्हणत संतापलेल्या दाम्पत्याने बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाबाहेर अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

युट्यूब पाहून बनवला बॉम्ब; आरोपीला नागपूरमधून अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना शुक्रवारी (दि.१५) घडली आहे.

पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातून सात महिन्यांपूर्वी गणेश मिसाळ याने अल्पवयीन मुलीला पळवून नेले आहे. मुलीच्या वडिलांनी याबाबत पिंपळनेर पोलिसात तक्रार नोंदवली होती. मात्र तीन महिने झाले तरी पिंपळनेर पोलीस मुलीचा शोध घेत नाहीत म्हणून मुलीचे आई-वडिल थेट जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे गेले. पुढे हा तपास एएचटीयू पथकाकडे देण्यात आला. तब्बल सात महिने झाले मात्र मुलीचा शोध लागला नाही. संशयित आरोपी गणेश मिसाळ याला पकडण्यात पोलिसांना यश मिळत नसल्याने संतापलेल्या दाम्पत्याने जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर शुक्रवारी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी उपस्थित पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर मुलीचा शोध आणि फुस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन मुलीच्या आई- वडिलांना न्याय मिळवून देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×