Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पोलीस सज्ज

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पोलीस सज्ज

तब्बल ६ हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी पुणे पोलीस सज्ज झाले असून, अनुयायींच्या सुरक्षिततेसाठी तब्बल ६ हजार पोलीस अमलदार, होमगार्डचा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच आपत्कालीन घटना रोखण्यासह सीसीटीव्ही मॉनिटरींगच्या माध्यमातून बारीक गोष्टींवर लक्ष देण्यासाठी विशेष प्राधान्य दिल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील उपस्थित होते.

पुण्यात साडेपाच हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई – सविस्तर बातमी 

पेरणे फाटा परिसरातील विजयस्तंभ सोहळ्यासाठी देशभरातील लाखो अनुयायी १ जानेवारीला दाखल होतात.त्यापार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरपासूनच कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी दक्षता घेतली आहे. जागोजागी कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, विविध पथकांकडून सुरक्षिततेसाठी विशेष प्राधान्य दिले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफची पथके तैनात केली आहेत. जागोजागी पोलीस मदत केंद्र, वॉच टॉवर उभारले आहेत. त्यासोबतच सोहळ्यासाठी आलेल्या अनुयायींच्या वाहन पार्विंâगसाठी मोठ्या जागेची उपलब्धता केली आहे. वाहन तळापासून सार्वजनिक बसेसच्या माध्यमातून अनुयायींची विजयस्तंभापर्यंत ने-आणची सोय केली आहे. सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी प्राधान्य दिल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

३१ डिसेंबरला शहरातही तगडा बंदोबस्त

नववर्षांच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरला पुणे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. त्याअनुषंगाने सर्वच पोलीस ठाण्यातंर्गत बंदोबस्त तैनात केला असून, शहरभरात तीन हजारांवर पोलीस अमलदारांसह अधिकारी दक्ष राहणार आहेत. त्यासोबत ८०० वाहतूक अमलदार, अधिकारी तैनात केले आहेत. प्रामुख्याने शहरभरातील महत्वाच्या ठिकाणांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह पॉइंट केले आहेत. त्यानुसार बेशिस्त वाहन चालक, मद्यपी चालकांविरूद्ध दंडात्मक कारवाईसह प्रसंगी वाहन जप्तीचीही कारवाई केली जाणार आहे.

बेशिस्त पब, हॉटेलविरूद्ध होणार कारवाई

राज्य शासनाच्या आदेशानुसार पोलिसांकडून विविध नियमांची अमलंबजावणी केली जाणार आहे. हॉटेल पब, बार मालकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अल्पवयीनींना मद्याची विक्री न करणे, वेळेचे बंधन पाळणे महत्वाचे आहे. तसेच पबमधील संगीताचा आवाज इतरांना त्रासदायक ठरणार नाही, याचीही संबंधितांनी काळजी घेणे गरजेचे आहे. हॉटेल व्यावसायिकांनीही दक्षता घ्यावी. दरम्यान, खासगी पार्ट्यासह स्थानिकांनी शाळा, महाविद्यालय हॉस्टेल, रूग्णालय परिसरात मुझ्यिकच्या आवाजाची मर्यादा बाळगणे बंधनकारक आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×