Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यासंदर्भात पूर्वतयारी बैठक

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यासंदर्भात पूर्वतयारी बैठक

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी आणि संबंधित कटक मंडळांची आढावा बैठक

marathinews24.com

पुणे – जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी आणि संबंधित कटक मंडळांची आढावा बैठक घेण्यात आली.

हिंद-दी-चादर या कार्यक्रमात शहरातील जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे–महापौर रवि लांडगे – सविस्तर बातमी 

बैठकीत पुणे जिल्ह्यातील जनगणनेचे कामकाज सुरळीत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जनगणना हा अत्यंत महत्त्वाचा आणि व्यापक प्रशासकीय उपक्रम असून त्यासाठी तालुका स्तरावर आवश्यक मनुष्यबळ, अधिकारी व कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याबाबत सर्व संबंधित विभागांना सूचित करण्यात आले.

जनगणना प्रक्रिया यंदा डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असल्याने घरगुती यादी (House Listing) अचूक व अद्ययावत तयार करण्याबाबत विशेष भर देण्यात आला. घरगट यादी तयार करताना भौगोलिक सीमा, नव्याने स्थापन झालेल्या वसाहती, स्थलांतरित कुटुंबे आदी बाबींची अचूक नोंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, प्रशिक्षण कार्यक्रमांचे नियोजन, तांत्रिक अडचणींचे वेळेत निराकरण आणि सर्व विभागांमधील समन्वय यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. जनगणना २०२७ चे काम वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×