घर रिकाम करण्यासाठी धमकी, गुन्हेगारी टोळीवर केस
Marathinews24.com
पुणे – कोर्टाचा निकाल आमच्या बाजुने लागला आहे म्हणत, घर खाली करण्यासाठी दबाब टाकून धक्काबुक्कीसह मारहाण करणार्या १० ते ११ जणांच्या टोळक्यावर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, प्रकरणाची न्यायालयात सुनावणीची पुढील तारीख १६ जून असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
कोयत्याने हल्ला करून दहशत पसरवणारा अटकेत – सविस्तर बातमी
प्रविण मोगरे, सौरेश मोगरे, दिपक मोरगरे, राकेश मोगरे, प्रदिप मोगरे, अर्चना प्रविण यांच्यासह इतर तीन ते चार जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता भैय्यालाल अहीर (५४, रा. सोलापूर बाजार कॅम्प, पुणे) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आहिर आणि त्यांचे कुटूंबिय दि. १५ एप्रिलला कॅम्पमधील घर क्रमांक ६९ येथे उपस्थित होते. त्यावेळी आरोपींनी कोर्टाचा निकाल आमच्या बाजुने लागला म्हणत घर खाली करण्यासाठी दबाव टाकला. त्यानंतर तक्रारदाराने घरातील सगळ्यांनी बाहेर काढून घराला कुलुप लावले. त्यावेळी आरोपीनी घराचे कुलुप तोडत असताना फिर्यादीनी त्याला विरोध केला. त्यावेळी तक्रारदाराला धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्यात आली.