Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

अतिरेक्यांकडे मोबाइल क्रमांक सापडल्याची बतावणी

अतिरेक्यांकडे मोबाइल क्रमांक सापडल्याची बतावणी

पुण्यात महिलेला ९७ लाखांचा गंडा

marathinews24.com

पुणे – पोलीस अधिकारी बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एका महिलेला तब्बल ९७ लाखांचा गंडा घातला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मोबाइल क्रमांक जम्मू-कश्मीरातील पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत सापडल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर बँकखाते तपासणीच्या नावाखाली महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना २७ मार्च ते ७ एप्रिल २०२६ कालावधीत कॅम्पमध्ये घडली आहे. याप्रकरणी ५४ वर्षीय महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पीपीएफ स्टेटमेंटच्या बहाण्याने लिंक पाठवून फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कॅम्प परिसरात राहायला असून, २७ मार्चला सायबर चोरट्याने त्यांना फोन करून पोलीस अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली. तक्रारदार महिलेच्या नावावर असलेला मोबाइल क्रमांक जम्मू कश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेला बँकखाते तपासणीसाठी डिटेल्स मागवून घेतले. त्यांचा विश्वास संपादित करून तक्रारदार महिलेला ९७ लाख रूपये वर्ग करण्यास भाग पाडले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करीत आहेत.

पीएफ अकाउंट तपासणी पडली १४ लाख ५० हजारांना

पीएफ अकाउंटची तपासणी करणे एका जेष्ठ महिलेला चांगलेला महागात पडले आहे. महिलेने गुगलद्वारे संपर्क क्रमांक शोधून त्यावर फोन लावला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेला व्हॉटसअ‍ॅप कॉलद्वारे संभाषण करीत स्टेंटमेंट पाठवून दिले. लिंक उघडण्यास समस्या असल्याचे सांगून मोबाइलचा अ‍ॅक्सेस घेत सायबर चोरट्यांनी महिलेची १४ लाख ५० हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना ७ एप्रिल २०२६ रोजी औंधमध्ये घडली असून, ६५ वर्षीय महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×