Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात २० मे रोजी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना शिबिर

युवकांना सहभागी होण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) अंतर्गत MY Bharat, पुणे यांच्या वतीने २० मे २०२६ रोजी गेट क्रमांक २, महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड, चाकण येथे इंटर्नशिप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेद्वारे युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि रोजगारक्षम कौशल्ये उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

‘ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार – सविस्तर बातमी

या शिबिरामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडमध्ये बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ५०० जागा तसेच आयटीआय पात्र उमेदवारांसाठी १० जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या १८ ते २५ वयोगटातील आणि पूर्णवेळ नोकरीत नसलेल्या युवकांना प्रतिमहिना १८ हजार रुपये मानधन तसेच ६ हजार रुपये जॉइनिंग ग्रँट देण्यात येणार आहे. इंटर्नशिपचा कालावधी ६ ते ९ महिन्यांचा राहणार आहे. पात्र युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

उमेदवारांनी शैक्षणिक प्रमाणपत्रे, बायोडाटा तसेच आधार कार्ड किंवा इतर जन्मतारीख पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. सहभागी होण्यासाठी सोबत देण्यात आलेल्या QR कोडद्वारे नोंदणी करावी, असेही कळविण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×