हडपसरमध्ये खासगी रुग्णालयाची तोडफोड भोवली

आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसरमध्ये खासगी रुग्णालयातत तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. रुग्णालयातील अधिकारी अभिजित अंकुश शिवणकर (वय ४२) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अजय केरु सपकाळ, शुभम संजय सपकाळ, कुणाल हनुमंत सकपाळ, गौरव गणेश सकपाळ, विश्वजीत कुंडलिक कुमावत, मंगेश दत्तात्रय सपकाळ, वैभव हनुमंत सपकाळ, विनायक अजय सपकाळ (सर्व रा. उद्योगनगर, महंमदवाडी, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मस्यपालन व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये, मालमत्तेची हानी किंवा नुकसान) यांना प्रतिबंध कायदा -२०१० कलम ३ आणि ४ अन्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील एका खासगी रुग्णालयात केरु सपकाळ यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डाॅक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे सपकाळ यांचा मृत्यू झाल्याच आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. सपकाळ यांचा मुलगा याने अन्य आरोपींना चिथावणी दिली. रुग्णालयात तोडफोड केली. रुग्णालयातील डाॅक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. शिवणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×