Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

मस्यपालन व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बनावट मंजुरी पत्र देऊन फसवणूक

समर्थ पोलिसांकडून गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मस्यपालन व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पालघरमधील तीन जणांविरुद्ध समर्थ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश पागधरे (वय ६०), विजया गणेश पागधरे (वय ५७), विपुल गणेश पागधरे (वय ३१, तिघे रा. तडीयाल, ता. डहाणू, जि. पालघर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे बिबवेवाडी भागात राहायला आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची आरोपींशी २०१९ मध्ये ओळख झाली होती. डहाणूतील बोर्डी गावाजवळ शासनाकडून कोळंबी पालनासाठी भाडेतत्त्वावर जागा मिळाली आहे. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले होते. आरोपींची त्यांनी रास्ता पेठेतील एका हाॅटेलमध्ये भेट घेतली होती. त्यानंतर आरोपींनी तक्रारदाराकडून वेळोवेळी पैसे घेतले. गेल्या चार ते पाच वर्षात त्यांच्याकडून १२ लाख रुपये घेतले. आरोपींनी त्यांना परतावा दिला नाही. तक्रारदाराने पैसे परत करण्याची मागणी केली. तेव्हा आरोपींनी टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक कुंभार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×