Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन

पार्थिवावर गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता होणार अंत्यसंस्कार

marathinews24.com

पुणे – पोलीस दलाच्या गुन्हे शाखेच्या युनिट एकचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे गुरुवारी (दि. ११) पहाटेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबियांसह पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. अतिशय हुशार, उत्कृष्ट मार्गदर्शक गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. भोसले यांच्या पार्थिवावर गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता हडपसर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यावेळी त्यांना पोलीस मानवंदना दिली जाणार आहे.

टेस्ट ट्रॅकच्या नुतनीकरणामुळे अनुज्ञप्ती चाचणीच्या कामकाजात बदल – सविस्तर बातमी

संदीप भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केली आहे. विशेषतः पुणे गुन्हे शाखेत कार्यरत असताना त्यांनी कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांना वठणीवर आणण्यासाठी प्राधान्य दिले होते. कोयता, पिस्तूल विक्री शोधून आरोपींना मध्य प्रदेशातून अटक करण्यात त्यांचा हातखंडा होता. राज्यातील विविध ठिकाणी काम करताना त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. ज्याठिकाणी कार्यरत झाले, त्याठिकाणी गुन्हेगारी मोडीत काढून परिसरात कायदा सुव्यवस्था मजबूत केला होता. त्यामुळे भोसले सर्वसामान्य नागरिकांच्या पसंतीस उतरले होते.

पोलीस खात्यात सेवा बजावत असताना काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यामुळे त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा सेवेत हजर होऊन कामाचा सपाट कायम ठेवला होता. मात्र, मागील वर्षांपासून त्यांना पोटाचा आजार पुन्हा बळावला होता. तरीही त्यांनी हार न मानता विविध ठिकाणी काम केले. मात्र, गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×