बँकांचे खासगीकरण देशाच्या आर्थिक विकासाला मारक

बँकांचे खासगीकरण देशाच्या आर्थिक विकासाला मारक

कॉ. सी. एच. वेंकटचलन यांचे मत; बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांच्या नवव्या अधिवेशनाचे उद्घाटन – अर्थपत्रकारितेतील योगदानाबद्दल सुचेता दलाल यांना ‘कॉ. सुरेश धोपेश्वरकर स्मृती पुरस्कार’ प्रदान

marathinews24.com

पुणे “देशाच्या आर्थिक विकासात बँकिंग क्षेत्राचे योगदान मोठे आहे. सरकारी बँकांमध्ये सर्वसामान्य जनतेचा २५ लाख कोटींहून अधिक पैसा सुरक्षित आहे. मात्र, केंद्र सरकार परकीय भांडवलदारांना पायघड्या घालत बँकांचे खासगीकरण करण्याचे धोरण राबवू पाहत आहे. हे पाऊल आर्थिक विकासाला मारक असून, खासगीकरणाविरोधातील लढा आपल्याला तीव्र करावा लागेल,” असे मत ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे (एआयबीईए) महासचिव कॉ. सी. एच. वेंकटचलन यांनी व्यक्त केले.

केजमधील कामचुकार कर्मचाऱ्यांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक – सविस्तर बातमी 

‘एआयबीईए’शी संलग्नित ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या (एआयबीओएमईएफ) दोन दिवसीय नवव्या अखिल भारतीय अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी झाले. बीएमसीसी रस्त्यावरील दादासाहेब दरोडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार व मनीलाईफ फाऊंडेशनच्या संस्थापिका पद्मश्री सुचेता दलाल यांना ‘कॉ. सुरेश धोपेश्वरकर स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्रचे निधू सक्सेना, बँक ऑफ इंडियाचे व्ही. सी. जोशी, बँक ऑफ महाराष्ट्रचे कॉ. कृष्णा बरुरकर, ‘एआयबीईए’चे उपाध्यक्ष कॉ. एन. शंकर, महासचिव देवीदास तुळजापूरकर, संयुक्त सरचिटणीस कॉ. ललिता जोशी, संयोजक शैलेश टिळेकर आदी उपस्थित होते. देशभरातील ६०० पेक्षा अधिक बँक कर्मचारी या अधिवेशनात सहभागी झाले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×