Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यात विविध घरफोडीत ६ लाखांचा ऐवज लांबविला

सिंहगड रस्ता भागात भरदिवसा घरफोडी

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून सहा लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. मार्केट यार्ड, कात्रजमधील आंबेगाव, तसेच सिंहगड रस्ता परिसरात घरफोडीच्या घटना घडल्या.

सोसायटीच्या आवारात दुचाकी पेटवून दिली – सविस्तर बातमी

मार्केट यार्डातील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला मार्केट यार्ड भागातील बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावरील गणात्रा सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील रोकड, दागिने असा एक लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक भापकर तपास करत आहेत.

कात्रजमधील आंबेगाव भागात एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण दत्तनगर परिसरातील तोरणा हाईटस सोसायटीत राहायला आहे. चोरट्यांनी शनिवारी (२१ मार्च) सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी दागिने लांबविल्याची घटना सायंकाळी उघडकीस आली. पोलीस उपनिरीक्षक कळमकर तपास करत आहेत.

सिंहगड रस्त्यावरील गणेश पार्क सोसायटीत सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७३ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार मुकुंद तारु तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×