खराडीत पोलिसांकडून कारवाईचा बडगा
Marathinews24.com
पुणे – मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा खराडी पोलिसांनी पर्दापाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत, दोन परदेशी तरुणींसह ६ जणींना ताब्यात घेतले.
दापोडी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सविस्तर बातमी
स्पा सेंटरचा मॅनेजर लेखोकाई कीपगेन ( वय ३०, रा. सिल्वर ब्युटी अँड वेलनेस, थिटेनगर, खराडी मुंढवा रोड, खराडी, मुळ रा. मणिपूर) आणि स्पा मालक विकास किशोर ढाले (वय ३०, रा. ३९१, माहुली जहांगीर, अमरावती) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे असून, कीपगेनला पोलिसांनी अटक केली आहे. खराडी पोलिस ठाण्याच्या पोलिस शिपाई पूजा डहाळे (वय २९) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्वर ब्युटी अँड वेलनेस, गोल्ड प्लाझा बिल्डिंग, दुसरा मजला, थिटे नगर, खराडी मुंडवा रोड, खराडी येथील स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती खराडी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून शहानिशा केली. तेव्हा स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानंतर पथकाने छापा टाकून कारवाई केली. परदेशातील तरुणींसह ६ जणींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
चौकशीत कीपगेन आणि ढाले यांनी तरुणींना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करुन स्पा च्या नावाखाली त्यांच्या कडून वेश्याव्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे सांगितले. याप्रकरणी आरोपींवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत.