Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

बिबवेवाडीत मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रय

पोलिसंचा छापा; महिला अटकेत

marathinews24.com

पुणे – शहरातील बिबवेवाडीत मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रयाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली. या कारवाईत दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. तरुणींना देहविक्रयास प्रवृत्त करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली.

गांजा विक्री करणारे रिक्षाचालक गजाआड – सविस्तर बातमी

याप्रकरणी किरण भरतराज अवदुते (वय ३०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) हिला अटक करण्यात आली. तिच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बिबवेवाडीत विश्व आयुर्वेद उपचार केंद्रात मसाजच्या नावाखाली देहविक्रय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. या कारवाईत दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोीलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक विशांत चव्हाण, ईश्वर आंधळे, तुषार भिवरकर, बबनराव केदार, अमोल रसाळ, कोंडे, इंगळे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×