Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

गांजा विक्री करणारे रिक्षाचालक गजाआड

३५ किलो गांजासह रिक्षा जप्त

marathinews24.com

पुणे – रिक्षातून गांजा विक्री करणाऱ्या दोन रिक्षा चालकांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३५ किलो गांजा, रिक्षा असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चारुदत्त काळूराम चव्हाण (वय २५, रा. गंगानगर, फुरसुंगी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

कोयत्याचा धाक दाखवून दाम्पत्याला शिवीगाळ, आरोपीला अटक – सविस्तर बातमी

भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक कात्रज परिसरात गस्त घालत होते. आंबेगाव सेवा रस्त्यावर एक रिक्षा चालक थांबला असून, तो गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी चव्हाणला पकडले. त्याच्याकडून ३३ किलो गांजा आणि रिक्षा जप्त केली. चौकशीत तो रिक्षातून फिरून गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी त्याला अटक केली.

दोन दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ परिसरातून रिक्षातून गांजा विक्री करणाऱ्या एका रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून अर्धा किलो गांजा, तसेच रिक्षा जप्त करण्यात आली होती. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, गुन्हे शाखेचे निरीक्षक कैलास कोडग, सहायक पोलीस निरीक्षक स्व्पनील पाटील, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, महेश बारावकर, मंगेश पवार, किरण साबळे, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, अवधूत जमदाडे, सचिन सरपाले, मितेश चोरमले, नीलेश खैरमोडे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×