Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

सार्वजनिक गणेशोत्सव ही लोकमान्य टिळकांची प्रेरणादायी परंपरा- डॉ. नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पुणे गणेश वंदन

marathinews24.com

पुणे – शहरातील मानाच्या गणपती मंडळांचा व प्रमुख ऐतिहासिक मंडळांचा दौरा विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी ( दि.३०) केला. त्यांनी गणरायाचे दर्शन घेत भाविकांना शुभेच्छा दिल्या दौऱ्यात त्यांनी श्री कसबा गणपती, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती, श्री दत्त मंदिर, श्री मंडई गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम गणपती, श्री तुळशीबाग गणपती आणि श्री गणेश केसरी वाडा येथे दर्शन घेतले.

कारागृहातून बाहेर आला अन गांजा विक्री करू लागला – सविस्तर बातमी

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आजही समाजात भक्तिभाव, सामाजिक ऐक्य व सेवाभाव वाढवण्याचे कार्य करत आहे. पुण्यासह महाराष्ट्रभर हजारो गणेशभक्त या निमित्ताने एकत्र येतात, आणि लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना श्री गणेश आपल्याकडून चांगले कार्य घडवण्यासाठी प्रेरणा देतात. केसरी वाडा गणपती मंडळाचे दर्शन घेतले त्यावेळी केसरीचे सरव्यवस्थापक रोहित टिळक हे आवर्जून उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या फिजिओथेरपी शिबिरासारख्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. विविध गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित ‘योद्धा’ हे पुस्तक भेट दिले व त्यांचा सत्कारही केला. सामाजिक सेवेच्या परंपरेला पुढे नेण्यासाठी, “गणपती मंडळांना वर्षभर सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी योजना आखण्याचा माझा मानस आहे व त्याबाबत लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

दौऱ्यात त्यांच्या सोबत भगिनी व स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी प्रमुख उपस्थित होत्या. तसेच, शिवसेना महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुणाईत, सुरेखा कदम पाटील, अनिता परदेशी, कांताताई पांढरे, सारिका पवार, मनीषा परांडे, मीनल धनवटे, वैजयंती पाचपुते व किरण साळी (सचिव युवा सेना, महाराष्ट्र राज्य), आनंद गोयल (शहर संघटक, पुणे), राजू वीटकर (झोपडपट्टी विकास प्रमुख), नितीन पवार (उपशहर प्रमुख, कोथरूड) आणि शिवसेनेचे तसेच युवा सेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “राज्य सरकार व केंद्र सरकार या प्रश्नावर सकारात्मक दृष्टीकोन ठेवत आहेत. कोणाच्याही हक्कांवर गदा न आणता सर्व समाजघटकांना न्याय मिळावा हीच माझी गणरायाकडे प्रार्थना आहे. तसेच, येत्या महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढविण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×