Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षात त्यांचे साहित्य प्रकाशित करा

उपमहापौर परशुराम वाडेकर यांची मागणी

marathinews24.com

पुणे – महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त देशभर व राज्यभर विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. मात्र, या महत्त्वाच्या वर्षातही महात्मा फुले यांचे समग्र साहित्य शासनाच्या वतीने प्रकाशित झाले नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबत तीव्र खंत व्यक्त करत पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सुवर्णकाळातील ‘शलाका’ या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन – सविस्तर बातमी

उद्या महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शासकीय फोटो झिंको तसेच संबंधित शासकीय विभागांकडून महात्मा फुले यांच्या साहित्याची मागणी करण्यात आली असता, असे कोणतेही साहित्य उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामुळे संताप व्यक्त करत वाडेकर यांनी संबंधित विभागाने तातडीने महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय तसेच त्यांच्याशी संबंधित सर्व साहित्य प्रकाशित करावे, अशी मागणी केली आहे.

तसेच, राज्य शासनाच्या प्रकाशन विभागाचे प्रमुख या नात्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालून सर्व साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×