Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

Pune Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत ज्येष्ठ नागरिकांसह तिघांचा मृत्यू

Pune Accident News

बिबवेवाडी, लोणी काळभोर, तसेच वडगाव शेरी भागातील घटना

marathinews24.com

पुणे – Pune Accident News : शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोन ज्येष्ठ नागरिकांसह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बिबवेवाडी, लोणी काळभोर, तसेच वडगाव शेरी भागात घडली.

आंतराज्यीतील दरोडेखोर टोळीला अटक, २० गुन्ह्यांची उकल – सविस्तर बातमी 

बिबवेवाडीतील चंद्रलोक चौकात भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (१३ जुलै) सकाळी घडली. या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुकुंद अनंत तबीब (वय ७६, रा. कांचनगंगा सोसायटी, बिबवेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत राजेंद्र श्रीपाद साताळकर (वय ६४, रा. आशिष बंगला, राजर्षी शाहू सोसायटी, पर्वती) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुंद तबीब हे दररोज सकाळी फिरायला जायचे. सोमवारी सकाळी पाचच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडले. बिबवेवाडीतील चंद्रलोक चौकात भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार तबीब यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात घडली. लक्ष्मण नारायण होमकर (वय ७८, रा. श्री दत्तपार्क सोसायटी, लोणी काळभोर) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत स्नेहल गणेश व्हावळ (वय ४३, रा. वेदांत हाईट्स, तरवडे वस्ती, महंमदवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण होमकर हे दूध आणण्यासाटी कुंजीरवाडी परिसरात रस्ता ओलांडताना त्यांना दुचाकीने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या होमकर यांचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे तपास करत आहेत.

भरधाव दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. निकोलस व्हॅन विल्सन (वय ३५, रा. इम्पेरिअल टाॅवर, महंमदवाडी रस्ता, उंड्री) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत निकोलस यांची आई शेरलीन (वय ६०) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार निकाेलस हे गेल्या महिन्यात २६ जून रोजी पहाटे चारच्या सुमारास वडगाव शेरी परिसरातून निघाले होते. वडगाव शेरीतील न्याती मेडोज सोसायटीसमोर समोरुन येणाऱ्या भरधाव दुचाकीने दुचाकीस्वार निकोलस यांना धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. उपचारांदरम्यान त्यांचा खासगी रुग्मालयात मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×