हडपसरमधील घटना
marathinews24.com
पुणे – Pune ATM Fraud : एटीएममधून पैसे काढणाऱ्या एकाला मदत करण्याचा बहाणा करून चोरट्याने त्याच्या खात्यातून एक लाखांची रोकड लांबविल्याची घटना हडपसर भागात घडली. याबाबत एका तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर चोरट्यांकडून निवृत्त प्राचार्यांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३८ वर्षीय तरुण फुरसुंगीतील मंतरवाडी परिसरात राहायला आहे. हडपसर परिसरातील एका बँकेच्या एटीएममध्ये तक्रारदार तरुण गेला. त्या वेळी चोरटा एटीएमच्या परिसरात होता. तरुणाच्या पाठोपाठ चोरटा एटीएममध्ये शिरला. एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बतावणी चोरट्याने केली. तरुणाकडील एटीएम कार्ड घेऊन मदतीचा बहाणा केला. तरुणाकडून त्याने सांकेतिक शब्द घेतला. Pune ATM Fraud त्यानंतर मदतीचा बहाणा करुन चोरट्याने त्याच्याकडील एटीएम कार्ड तरुणाला दिले. तरुणाचे कार्ड चोरल्यानंतर चोरटा पसार झाला. त्यानंतर तक्रारदार तरुणाच्या बँक खात्यातून चोरट्याने एक लाख रुपयांची रोकड लांबविली. खात्यातून रोकड काढून घेण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली.




















