३५ लाख ५१ हजारांचा घातला गंडा
marathinews24.com
पुणे – केअर टेकर्सनी बनावट सह्या करून वेळोवेळी रक्कम काढून घेत एका कुटूंबाची तब्बल ३५ लाख ५१ हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२५ घडली असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी दोघांविरूद्ध चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश ज्ञानेश लिमकर (रा. वारजे माळवाडी )आणि आदित्य संजय मोरे (रा. पाषाण ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गिरीजा चंद्रन (वय ७२, रा. पाषाण ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
मित्रमंडळ काॅलनीत घरफोडी, ५ लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गिरीजा यांच्या पतीच्या देखभालीसाठी आरोपी आकाश आणि आदित्य हे सप्टेंबर २०२३ पासून कामाला होते. दरम्यानच्या कालावधीत दोघांनाहीही तक्रारदाराच्या म्हातारपणाचा गैरफायदा घेतला. तक्रारदार जेष्ठ महिलेच्या पतीचे चेकबुक, एटीएमकार्ड चोरले. त्याच्यावर खोट्या सह्या करून वेळोवेळी पैसे काढून घेतले आहे. मार्च २०२५ पर्यंत आरोपींनी तब्बल ३५ लाख ५१ हजार रूपये काढून घेत चंद्रन कुटूंबियाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करीत आहेत.