जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्व प्रस्तावित कामे 31 जुलै च्या आत सुरू करण्याचे नियोजन करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देश

31 जुलै 2025 च्या आत प्रस्तावित कामे सुरू करावीत – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश 

marathinews24.com

पुणे – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आचारसंहिता लक्षात घेता, सर्व कार्यान्वित यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत प्रस्तावित कामांना 25 जून पर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन 31 जुलै 2025 चे आत प्रस्तावित कामे सुरू करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

‘वारकरी भक्तीयोग’ कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील – सविस्तर बातमी 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत श्री डुडी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजाजन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित होते.

डुडी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व कार्यान्वित यंत्रणांनी आपले प्रस्तावास तात्काळ तांत्रिक मान्यता घ्यावी व 25 जून पूर्वी प्रशासकीय मान्यता घेऊन सर्व प्रस्तावित कामे 31 जुलै, 2025 च्या आत सुरू करावीत, डिसेंबर 2025 अखेर सर्व कामे पूर्ण करावीत. वरिष्ठ स्तरावरून घ्यावयाच्या मान्यतांसंदर्भात पाठपुराव्याकरिता यंत्रणांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असेही सांगितले. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत ‘नाविन्यपूर्ण योजना ‘यामध्ये नाविन्यपूर्ण कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन शाखेत तात्काळ सादर करावेत. या संदर्भात कृषी, महिला व बालविकास, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता नाविन्यपूर्ण विभाग, शिक्षण, पोलीस आदी विभागांनी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत निधीची मागणी नोंदवून प्रस्ताव सादर करावेत. असे त्यांनी सांगितले.

या बैठकीनंतर राज्य शासनाच्या दहा कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यासाठी एक कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले असून यामध्ये सर्व विभागांनी आपापला सहभाग नोंदवून जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी दिल्या. यावेळी जिल्ह्यातील सर्व विभागांना एक कोटी उद्दिष्टाच्या अनुषंगाने प्रत्येक विभागासाठीच्या उद्दिष्टांचे विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण), पुणे यांनी कार्यक्रम नियोजनाचे सादरीकरण केले . बैठकीला सर्व कार्यान्वित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top