Breking News
Pune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभा

Pune Crime : बालविवाह रोखल्यानंतर अत्याचाराचा प्रकार उघड

Pune Crime

पोलिसांकडून तरुणाला अटक

marathinews24.com

पुणे – Pune Crime : बाल विवाह रोखल्यानंतर सासुरवाडीकडील मंडळी अल्पवयीन युवतीला पुन्हा सासरी घेऊन गेले. त्यानंतर युवती अल्पवयीन असल्याची माहिती असताना तरुणाने तिच्यावर अत्याचार केले. युवतीने याबाबत पोलिसंकडे तक्रार दिल्यानंतर बाणेर पोलिसांनी एकाला अटक केली.

नांदण्यास नकार दिल्याने पत्नीची दुचाकी जाळली – सविस्तर बातमी 

तक्रारदार युवतीचा विवाह एका तरुणाशी निश्चित करण्यात आला होता. युवती अल्पवयीन असल्याची माहिती सासरकडील मंडळींना होती. अल्पवयीन युवतीचा विवाह करण्यात येत असल्याची माहिती ‘चाईल्ड हेल्पलाइन’ या स्वयंसेवी संस्थेला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने विवाह रोखण्यात आला. नोव्हेंबर २०२५ मध्ये तरुणाच्या वडिलांनी युवतीला सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील घरी नेले. लोणंद येथे दोन महिने युवती राहिली. दरम्यान, बालविवाह रोखल्यानंतर युवतीला सासरकडील मंडळींनी पुन्हा नांदण्यास नेले असल्याची माहिती ‘चाईल्ड हेल्पलाईन‘ला मिळाली. स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्त्यांनी तिची तेथून सुटका केली. त्यानंतर युवतीची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत युवतीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.

युवती अल्पवयीन असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. त्यानंतर युवतीने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) २२ वर्षीय तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शैला पाथरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×