Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

नांदण्यास नकार दिल्याने पत्नीची दुचाकी जाळली

गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष; ३५ लाखांची फसवणूक

वारजे पोलिसांकडून एकाला अटक

marathinews24.com

पुणे – पत्नीने वादातून नांदण्यास नकार दिल्याने एकाने तिची दुचाकी पेटवून दिल्याची घटना वारजे भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. राजकुमार इरन्ना सुतार (वय २७, रा. समर्थनगर, सिंहगड रोड) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत त्याच्या पत्नीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी आणि आराेपी सुतार यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यानंतर ती माहेरी निघून आली. पत्नी वारजे – एनडीए रस्त्यावरील शिवणे परिसरात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहे. गेले दीड महिने पत्नी नांदायला येत नसल्याने आरोपी सुतार तिच्यावर चिडला होता. रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास तो पत्नी राहत असलेल्या सोसयाटीत आला. त्याने पत्नीची दुचाकी पेट्रोल ओतून पेटवून दिली. आग भडकल्यानंतर दुचाकी पूर्णपणे जळाली.

पत्नीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पतीने दुचाकी पेटवून दिल्याचा संशय तिने फिर्यादीत व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी सुतार याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे तपास करत आहेत. विश्रांतवाडीतील धानोरी भागात एका सोसायटीत तरुणासाेबत वाद झाल्यानंतर त्याची दुचाकी पेटवून देण्याची घटना नुकतीच घडली होती. दुचाकीला आग लागल्यानंतर सोसायटीतील अन्य वाहनांना झळ पोहोचली होती. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एकाला अटक केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×