Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

Pune Crime News : सहकारनरमध्ये टोळक्याची दहशत; मोटारींची तोडफोड

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.

१८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : शहरातील सहकारनगर भागातील मल्हार मार्तंड सोसायटीत टोळक्याने दहशत माजवून चार मोटारींची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत निलेश उमेश मोहिते (वय ३८, रा. मल्हार मार्तंड सोसायटी, सहकारनगर क्रमांक एक, पद्मावती ) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत ज्येष्ठ नागरिकांसह तिघांचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्हार मार्तंड सोसायटीच्या आवराात सोमवारी (१३ जुलै) मध्यरात्री एकच्या सुमारास वेगवेगळ्या दुचाकीवरुन टाेळके आले. त्यांनी सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ केली. आरडाओरडा करुन चोरट्यांनी शस्त्रे उगारली. सोसायटीच्या आवारात लावलेल्या चार मोटारींच्या काचा फोडून दहशत माजविली. टोळके दुचाकीवरुन पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत संघर्षी तपास करत आहेत.

टोळक्याकडून दाम्पत्याला मारहाण

टोळक्याने दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना वारजे भागातील रामनगर परिसरात घडली.याप्रकरणी प्रथमेश जाधव, यश जाधव यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुमार नागनाथ जाधव (वय ४१, रा. वर्धमान टाऊनशिप, ससाणेनगर, हडपसर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव यांची बहीण आणि मेहुणे हे वाढदिवस साजरा करुन रामनगरमधील वेताळबाबा चौकातून निघाले होते. त्या वेळी टोळक्याने दुचाकी अडवली. जाधव यांची बहीण आणि मेहुण्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक हंस तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×