Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून महिलेची फसवणूक

गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून महिलेची फसवणूक

‘गॅस बिल थकले’चा बनाव करून एपीके फाईल पाठवली; बँक खात्याची माहिती मिळवत १३ लाख ९ हजार रुपये लांबविले

marathinews24.com

पुणे – गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी कोथरूड भागातील एका महिलेची १३ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार ५५ वर्षीय महिला कोथरूड भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची १ कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी 

घरगुती वापरासाठी पाईपद्वारे पुरविण्यात येणाऱ्या गॅसचे मासिक देयक थकले असून, गॅस पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे, अशी भीती सायबर चोरट्यांनी त्यांना दाखविले. चोरट्यांनी त्यांना एक एपीके फाईल पाठविली. बँक खाते, डेबीट कार्डची माहिती चोरट्यांनी घेतली. या माहितीचा गैरवापर करुन सायबर चाेरट्यांनी महिलेच्या बँक खात्यातून १३ लाख ९ हजार रुपये लांबविले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत.

सिमेंट मिक्सरच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू

सिमेंट मिक्सरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावर फुरसुंगी परिसरात घडली. अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. या प्रकरणी मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
राधेकृष्ण धुरण यादव (वय २३, रा. गुरुदत्त काॅलनी, गंगानगर, फुरसुंगी, मूळ रा. बिहार) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार तपन राजेश महातो (वय २५) जखमी झाला आहे. याबाबत महातो याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सिमेंट मिक्सर चालक राहुल कुमार (वय २४, रा. नेडिया बाजार, जि. पलामू, झारखंड) याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार तपन आणि त्याचा मित्र राधेकृष्ण हे हडपसर-सासवड रस्त्यावरुन शुक्रवारी (२१ ऑगस्ट) रात्री पावणेनऊच्या सुमारास फुरसुंगीतील भेकराईनगर बस थांब्याजवळून निघाले होते. त्यावेळी भरधाव सिमेंट मिक्सरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी यादव गंभीर जखमी झाला. दुचाकीस्वार महातो याला दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यादव आणि महाते यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच यादव याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. अपघातानंतर मिक्सर चालक राहुल कुमार याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती माने तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×