Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

शेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली

शेअर्समधील गुंतवणूक पडली महागात

फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींग करण्यास भाग पाडून सायबर चोरट्याने एकाला तब्बल ४ लाख ५७ हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगून गंडा घातला आहे. ही घटना २० जून ते १ ऑगस्ट २०२५ कालावधीत कसबा पेठेत घडली आहे. याप्रकरणी ५३ वर्षीय व्यक्तीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कसबा पेठेत राहायला असून, २० जून २०२५ रोजी सायबर चोरट्याने त्यांना संपर्क साधला होता. आयआयएफएल या ब्रोकर मार्फत शेअर ट्रेडींग करण्यास सांगितले होते. अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगून अकाउंट उघडण्यासही भाग पाडले.त्यानंतर सायबर चोरट्याने तक्रारदाराचा विश्वास संपादित करुन ४ लाख ५७ हजारांची गुंतवणूक करुन घेतली. त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने नुकतीच फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेश महाला तपास करीत आहेत.

एटीएम कार्डच्या अदलाबदलीने ३० हजार काढले

बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासून देण्याची बतावणी करीत एकाने एटीएम सेंटरमध्ये तक्रारदाराकडील एटीएमकार्ड ताब्यात घेतले. हातचलाखीने स्वतःकडील बंद कार्ड तक्रारदाराला परत दिले. त्यानंतर आरोपीने तक्रारदाराच्या एटीएम कार्डचा वापर करुन बँकखात्यातून ३० हजार रुपये काढून फसवणूक केली आहे. ही घटना २३ ऑगस्टला चंदननगर परिसरातील बीडी कामगार वसाहत जवळ घडली आहे. याप्रकरणी चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अमलदार भालचिम तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×