Breking News
महावितरणच्या रोहित्रातून तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआडलावणी नृत्यांगना राधा पाटील हिच्यासह मंडळाच्या अध्यक्षांविरुद्ध गुन्हामध्यस्थी प्रक्रियेत पक्षकारांचे म्हणणे समजून घेणे आणि संवाद महत्त्वाचानवीन कामगार कायद्याबाबत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमउत्सवांचे पावित्र्य जपत ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण गरजेचे- रोहित टिळकपुण्यात दहीहंडी पाहणे महागात, तरुणांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन चोरीलाएसटीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, मित्र जखमीगौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरणातील सरकारी पक्षाची अनुपस्थिती गंभीर : डॉ. नीलम गोऱ्हेमहाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला बेड्याशाडू मातीपासून चिमुकल्यांनी साकारला पर्यावरणपूरक बाप्पा

लावणी नृत्यांगना राधा पाटील हिच्यासह मंडळाच्या अध्यक्षांविरुद्ध गुन्हा

लावणी नृत्यांगना राधा पाटील हिच्यासह मंडळाच्या अध्यक्षांविरुद्ध गुन्हा

पुण्यात दहीहंडी उत्सवात विनापरवाना कार्यक्रमाचे आयोजन

marathinews24.com

पुणे – दहीहंडी उत्सवात विनापरवाना कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी बिबवेवाडीतील मंडळाच्या अध्यक्षांसह लावणी नृत्यांगना राधा पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दहीहंडी उत्सवात कार्यक्रम सादर करताना अश्लील नृत्य प्रकारांना बंदी घालण्यात आली होती. कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण प्रमाणपत्र सादर करण्याची अट घातली होती. राधा पाटील (मुंबई) बिबवेवाडीतील एम्पायर ग्रुपचे अध्यक्ष भूषण अभिमान साेनवणे (रा. अंबामाता मंदिराजवळ, सुखसागरनगर) आयोजक अमोल काटे (रा. कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार नंदलाल भादले यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात दहीहंडी पाहणे महागात, तरुणांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीहंडी उत्सवात एम्पायर ग्रुप ए. के. बाॅईजचे अध्यक्ष भूषण साेनवणे आणि कार्यकर्त्यांनी राधा पाटील यांचा लावणी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. परवानगी मिळण्यासाठी मंडळाकडून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अर्ज सादर करण्यात आला होता. या अर्जांच्या अनुषंगाने राज्यातील कला, लोककला, चित्रपट, सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र पोलिसांना सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार कार्यक्रमासाठी परवानगी मिळण्यासाठी पोलिसांकडे अर्ज सादर करावा लागतो. कार्यक्रमाचे आयोजक, तसेच लावणी नृत्यांगना राधा पाटील यांच्याकडून अशा प्रकारची परवानगी मिळविण्यासाठी पोलिसांकडे अर्ज सादर करण्यात आला नव्हता. अधिकृत कागदपत्रे सादर न केल्याने बिबवेवाडी पोलिसांनी परवानगी नाकारली होती.

सहायक पोलीस निरीक्षक गरड आणि पथकाने दहीहंडी सोहळा साजरा करणाऱ्या मंडळांना शनिवारी भेट दिली. तेव्हा विनापरवानगी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे दिसून आले. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गरड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×