पुण्यात कारची काच फोडून रोकड लांबवली; ५ लाखांचा ऐवज गायब, पुण्यातील मित्र मंडळ चौकातील घटना
Marathinews24.com
पुणे – मोटारीची काच फोडून ५ लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना पर्वती भागातील मित्र मंडळ चौकात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पर्वती पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. व्यावसायिक तरुणाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण मार्केटयार्डात राहायला आहे. तक्रारदार तरुणाच्या कुटुंबीयांचा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी लागणारी रोकड काढण्यासाठी तरुण मोटारीतून बँकेत गेला होता. तेथून रोकड काढून तो शुक्रवारी (४ एप्रिल) मित्र मंडळ चौकात आला. मित्र मंडळ चौक परिसरात त्याने मोटार उभी केली होती. दुपारी साडेचारच्या सुमारास चोरट्यांनी मोटारीची काच फोडून खोक्यात ठेवलेली ५ लाख रुपयांची रोकड चोरुन नेली. पोलीस कर्मचारी मरगजे तपास करत आहेत.
रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणाचा मोबाइल हिसकावून चोर पसार – सविस्तर बातमी
दुचाकीची डिकी उचकटून रोकडची चोरी
मार्केटयार्ड भागात दुचाकीची डिकी उचकटून चोरट्यांनी १ लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना मार्केटयार्ड भागात घडली. याबाबत तरुणाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कात्रज भागातील दत्तनगर परिसरात राहायला आहे. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास तो मार्केटयार्ड परिसरात कामानिमित्त गेला होता. सातारा रस्त्यावरील उत्सव हाॅटेल परिसरात त्याने दुचाकी उबाजी केली होती. चोरट्याने डिकी उचकटून १ लाख रुपयांची रोकड चोरुन नेली. पोलीस कर्मचारी झेंडे तपास करत आहेत.