गणेशोत्सवाच्या गर्दीत सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
marathinews24.com
पुणे – Pune Crime News श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी कुटुंबीयांसोबत आलेल्या ४६ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेत चोरट्याने चोरून नेले. बुधवार पेठेतील बेलबाग चौक परिसरात १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता प्रशांत निलाखे (वय ४६, रा. बी/१०३, शिवगोरक्ष विहार, टेल्को कॉलनी, लेन क्रमांक ५, दत्तनगर, आंबेगाव, पुणे) यांनी तक्रार दिली आहे.
पुण्यातील रीलस्टार संतोष पंडित यांना जामीन – सविस्तर बातमी
निलाखे कुटुंबीयांसोबत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी शहरात आल्या होत्या. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान त्या सीटी पोस्टपासून समाधान हॉटेलजवळील बेलबाग चौक परिसरात होत्या. गणेशोत्सवामुळे या परिसरात मोठी गर्दी होती. या गर्दीमध्ये अज्ञात व्यक्तीने त्यांच्या संमतीशिवाय गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.
चोरीला गेलेले मंगळसूत्र १४.९०० ग्रॅम वजनाचे असून, त्याची किंमत ९३ हजार २३३ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गर्दीतून प्रवास करताना मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर निलाखे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. फरासखाना पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून (Pune Crime News), बेलबाग चौक तसेच परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत आहे. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याची ओळख पटवून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
बसमधून प्रवास करताना महिलेची सोन्याची बांगडी चोरीला
महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. तक्रारदार १० सप्टेंबरला हडपसर गाडीतळावर बसमधून उतरताना गर्दीचा फायदा घेऊन ही चोरी करण्यात आली. बांगडीची किंमत ७० हजार रुपये असून, याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललीता मधुसूदन गो-हे (वय ५७, रा. डांगे चौक, वाकड रोड, गणेशनगर, थेरगाव, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्या पतीसोबत बसने प्रवास करीत होत्या. हडपसर गाडीतळावर उतरत असताना गर्दीमध्ये त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी चोरीला गेली. हडपसर पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.




















