कर्मचारी गंभीररित्या जखमी, ससून जवळील घटनेने खळबळ
marathinews24.com
पुणे – रेल्वे स्टेशन परिसरात गांजा ओढणार्या नशाखोरांना हटकल्याच्या रागातून त्यांनी रेल्वे पोलिसाला (जीआरपीएफ) अडवून गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोरांपैकी एकाने कर्मचार्याच्या गळ्यावर तर दुसर्याने छातीवर चाकूने वार केले. त्यांच्या डोक्यात दगडही मारल्यामुळे संबंधित कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना सोमवार दि.७ ) रात्री साडेआठच्या सुमारास ससून जवळील रस्त्यावर घडली. पसार झालेल्या आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांची केली बतावणी, जेष्ठाला ४८ लाखांचा ऑनलाईन गंडा – सविस्तर बातमी
अक्षय महादेव बोंबाळे (वय २८, रा. पुना गेस्ट हाऊस, बुधवार पेठ) असे गंभीररित्या जखमी झालेल्या जीआरपीएफ जवानाचे नाव आहे. रॉकी रणजित पात्रौ, विकी रणजित पात्रौ (रा. रेल्वे कॉर्टर) यांना अटक केली आहे.
अक्षय बोंबाळे हे रेल्वे जीआरपीएफचे कर्मचारी असून, त्यांच्याकडे रेल्वे रूळ परिसरात गस्त घालण्याचे काम आहे. ते गस्त घालत असताना आरोपी हे गांजा ओढताना दिसून आले होते. याबाबत त्यांनी आरोपींना काही वेळा हटकले होते. त्यांना हाकलून दिल्याचा राग आरोपींच्या मनात होता. सोमवारी सकाळी बोंबाळे यांनी आरोपींनी रेल्वे रूळ परिसरातून हाकलले होते. त्यानंतर ड्युटी संपवून ते घरी जात असताना, आरोपींनी त्यांना साडे आठच्या सुमारास ससून हॉस्पिटलच्या फुटपाथ जवळ अडवले. दुचाकी अडवून शिवीगाळ सुरू केली. तु आमच्या आईला ‘दारू व गांजा पितो’ हे का सांगितले असे म्हणत वाद घातला.
आरोपींनी अक्षयला खाली पाडून धारदार चाकूने गळा, छातीवर वार करून केले. तर एकाने त्यांच्या डोक्यात दगड घातला. अक्षय याच्याजवळील मोबाईल, दीड लाख रुपये सोन्याची चैन हिसकावून नेली. या घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी पसार झालेल्या आरोपींना नाना पेठेतून पकडले. आरोपींच्या हल्यात अक्षय हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या गळ्यावर ९ टाके पडले असून, छातीवर दोन टाके पडले आहेत. तर त्यांच्या डोक्याला देखील गंभीर मार लागला आहे. अधिक तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.






















