भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – खुनाच्या प्रयत्नात मागील तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पसार कालावधीत तो नेमका कुठे राहिला, त्याला कोणी मदत केली, याची माहिती पोलिसांकडून घेतली जाणार आहे. युवराज सुदाम देवकाते ( वय २० , रा शंकर मंदीराजवळ, हांडेवाडी, पुणे मुळ रा. साळवे गार्डन, साईनगर, कोंढवा बुद्रुक ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
कबुतराला मारत असताना तृतीयपंथीयाचा गोळीचा नियम चुकला – सविस्तर बातमी
वादातून खुनाच्या प्रयत्न केल्यानंतर पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्याचे आदेश भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाला दिले होते. त्यानुसार तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी , पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे हे आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान आरोपी युवराज देवकाते हा कान्हा हॉटेलच्या बाजुला थांबला आहे, अशी माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने कात्रज कोंढवा रोडवरील कान्हा हॉटेलजवळ जावुन आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आला. २५ एप्रिलला त्याला अटक केली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली. खुनाच्या प्रयत्नातील संबंधित आरोपी मागील तीन वर्षांपासून पसार होता. त्याचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आधारे आणि खबऱ्यांच्या माहितीनुसार आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. – सावळाराम साळगावकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे