Breking News
Pune Constitution Day Festival : महात्मा फुलेंच्या विचारांतून प्रेरणा घेऊन डॉ. आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केलीScience on Wheels Initiative India : विज्ञान लोकाभिमुख होण्यासाठी ‘सायन्स ऑन व्हील्स’ उपक्रम राबविणारPune District Court Security : जिल्हा न्यायालयातील सुरक्षेसाठी एसओपी तयार करणारPashudhan Yojana Maharashtra : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ग्रामीण युवकांना उद्योजक बनवेल- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेDevendra Fadnavis : दुय्यम न्यायालयातील कर्मचारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी तीन सदस्यीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसJyotirao Phule Women’s Rights : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षे विशेषPune Court Attack Case : ५० हजारांची सुपारी, मध्यप्रदेशातून पिस्तूलांची खरेदीCensus 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा

अल्पवयीन गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणणार-पोलीस आयुक्त अमितेश कुमार

अल्पवयीन गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणणार-पोलीस आयुक्त अमितेश कुमार

३ कोटी २६ लाखांचा मुद्देमाल सुर्पूत

marathinews24.com

पुणे – गुन्हेगारी नियंत्रणात ठेउन कळत नकळत गुन्हेगारीत अडकलेल्या अल्पवयीन मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यास पुणे पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. त्यानुसार संबंधिताच्या पुनर्वसनाचा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे, तसेच यंदाच्या गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणासंदर्भात दरवर्षीपेक्षा वेगळेच चित्र दिसणार असल्याचा विश्वास पोलीस आयुुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

पुण्यात नशाखोरांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला – सविस्तर बातमी 

परिमंडळ तीनच्यावतीने आयोजित संवाद परिवर्तन यात्रेला त्यांनी हिरवा झेंडा दाखविला. त्यावेळी ते बोलत होते. शुभारंभ लॉन्समध्ये झालेल्या कार्यक्रमात सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अभिनेते मोहन आगाशे, अपर आयुक्त राजेश बनसोडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

गुन्हेगारीत अडकलेल्या मुलांना दुर करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवाद परिवर्तन यात्रेचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मुलांमधील न्यूनगंड दूर करून त्यांच्यातील कला, कौशल्य, व्यक्तीमत्व विकासाच्या माध्यमातून आत्मविश्वास निर्माण करणे हाच उद्देश यात्रेच्या माध्यमाद्वारे अधोरेखित केला जात असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी तब्बल ३ कोटी २६ लाखांचा मुद्देमाल तक्रारदारांना वितरित करण्यात आला. तर लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या ९७१ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.

४८ मुलांनी अनुभवले कार्यशाळा

संवाद सत्रात सहभागी झालेल्या ४८ अल्पवयीन मुलांना मुर्तीकार विवेक खटावकर यांनी मुर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. तर क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या यशाचा आलेख समजावून सांगितले. व्याख्याते डॉ. संजय उपाध्ये यांनी अधात्म व जीवनाबाबत मुलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मुलांना चिंचवडमधील डॉन बास्को टेक्निकल इन्स्टिट्यूट याठिकाणी नेऊन तांत्रिक व कलात्मक कौशल्ये अनुभवले आहेत.

चोरीला गेलेला मुद्देमाल मिळाल्याने भारावले तक्रारदार

परिमंडळ तीनच्या हद्दीत घडलेल्या विविध गुन्ह्यांचा तपास करुन पोलिसांनी बहुतांश मुद्देमाल जप्त केला होता. त्यापैकी २९४ प्रकरणातील तब्बल ३ कोटी २६ लाखांचा मुद्देमाल मुळ मालकांना वितरित करण्यात आला. तसेच यावेळी लोहसहभागातून ९७१ हून अधिक व्यावसायिकांनी आपआपल्या हद्दीत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे लोकार्पण करण्यात आले.

यंदाच्या गणेशोत्सवात वेगळे चित्र दिसेल-पोलीस आयुक्त अमितेश कुमार

गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी मंडळांची तयारी झाली असून, पोलीस दलही सज्ज झाले आहे. विशेषतः गर्दीवर नियंत्रण ठेवणे, बंदोबस्त तैनात करण्यासाठी आम्ही नियोजन केले आहे. त्यासोबतच दरवर्षीपेक्षा यंदाच्या गणेशोत्सवात वेगळेच चित्र दिसणार आहे. प्रामुख्याने ध्वनी प्रदुषणाविरूद्ध सुरू झालेल्या चळवळीमुळे मंडळांचाही पाठिंबा आहे. आवाजाच्या डेसीबलची मर्यादा सर्वानीच पाळून पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×