Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी पुणेकरांचा ‘कँडल मार्च

जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी पुणेकरांचा 'कँडल मार्च

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त कनेक्टिंग ट्रस्ट व रोटरी क्लबतर्फे जनजागृती

marathinews24.com

पुणे – जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी कँडल मार्चचे आयोजन केले होते. आत्महत्या प्रतिबंधासाठी गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या कनेक्टिंग ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग यांच्या पुढाकारातून हा कँडल मार्च संभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता पुणे येथून निघून श्रेयस बँक्वेट, आपटे रस्ता येथे समाप्त झाला. या कँडल मार्चमध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ, रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड, रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास, रोटरी क्लब ऑफ पुणे मिडईस्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट, रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज क्लबचे सहकार्य लाभले.

पुण्यात अट्टल घरफोड्याला अटक; ७ मोबाईलसह ३ दुचाकी जप्त, खराडी पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी 

कनेक्टिंग ट्रस्टच्या संस्थापिका अर्णवाज दमानिया, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता मडकईकर, समन्वयक गायत्री दामले, विरेन राजपूत, रोटेरियन सुमेधा भोसले, रोटरी क्लब सारसबागचे आशुतोष वैद्य, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या अध्यक्षा मनिषा बेळगावकर, रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासच्या रुमा आगवेकर, मिडईस्टचे अध्यक्ष रोशन, रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टच्या अध्यक्षा अलका ओसवाल, रोटरी क्लब ऑफ पुणेचे अध्यक्ष जीवराज चोले, रोटरॅक्टचे समन्वयक सुमित गीते आदी उपस्थित होते. श्रेयस बँक्वेट येथे आत्महत्या प्रतिबंध जागृती करणाऱ्या नाट्यछटांचे सादरीकरण झाले. जीवनातील अंधकार दूर करून आरोग्यदायी आयुष्य जगण्याची प्रेरणा देणारा हा कँडल मार्च होता.

अर्णवाज दमानिया म्हणाल्या, “वीस वर्षांपूर्वी आत्महत्या प्रतिबंधासाठी काम सुरु केले, तेव्हा हा विषय निषिद्ध मानला जात होता. मात्र, आज आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करण्याच्या या अभियानात तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी होते, हे पाहून आनंद वाटतो. एकांत, शांतता ही मनाला खात असते. त्यामुळे संवाद करणे, एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. नैराश्य, दडपण, मानसिक कोंडी होत असेल, तर मन मोकळे करायला हवे. मनावर ओझे घेऊन जगत राहिलो, तर मनातील वाईट विचार प्रबळ होत जातात आणि आपण टोकाच्या विचारांकडे जातो.”

सुमेधा भोसले, अल्पना वैद्य यांनीही मनोगते व्यक्त केली. गायत्री दामले यांनी सुत्रसंचालन केले. मार्चमध्ये सहभागी स्वयंसेवकांनी हातामध्ये जनजागृतीपर फलक घेतले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×