अश्लील मेसेजसह केला व्हिडिओ कॉल
marathinews24.com
पुणे – पुण्यातील एका रिक्षा चालकाची विकृती उघडकीस आली आहे. प्रवाशी तरुणीने ऑनलाइन गुगल पे द्वारे केलेल्या पेमेंटचा चालकाने गैरफायदा घेतला. संबंधित तरुणीच्या नंबरवर त्याने फोन करून अश्लील व्हिडीओ पाठवून विनयभंग केला आहे.
मोलकरीणीकडून ४ लाखांच्या दागिन्यांची चोरी – सविस्तर बातमी
गुगल पे सह फोन पे नागरिकांच्या अंगवळणी पडले असून, अगदी छोटे मोठे- पेमेंट करायचे असले तरी ऑनलाइन ट्रान्सफर केले जाते. मात्र पेमेंट करताना आपण विचार करत नसल्याने त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून आले आहे. असाच एक धक्कादायक अनुभव गुगल पेव्दारे पेमेंट करणाऱ्या तरुणीला आला आहे. रिक्षा चालकाने तरुणीच्या मोबाईल नंबरवर अश्लिल व्हिडिओ आणि मेसेज पाठवून विनयभंग केला. याप्रकरणी रिक्षा चालकाविरुध्द हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २६ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनूसार अज्ञात रिक्षा चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीने वाघोली ते विमाननगर असा रिक्षातुन प्रवास केला होता. तेव्हा तिने रिक्षाचे २० रुपये भाडे गगुल पे व्दारे दिले होते. यामुळे तीचा मोबाईल नंबर हा रिक्षा चालकाकडे गेला होता. त्यानंतर रिक्षा चालकाने तीच्या मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ आणि मेसेज पाठवले , यानंतर व्हिडिओ कॉल करुन अश्लिल बोलण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याचा अश्लिल फोटोही पीडितेला पाठवला. तीने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्यावर त्याने दुसऱ्या मोबाईलवरुन पुन्हा असे प्रकार सुरु केले. अखेर तरुणीने हडपसर पोलीस ठण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जगदाळे करत आहेत.