Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

पुण्यात जेष्ठाला गुंतवणूकीची हाव पडली महागात

पोलिसांची केली बतावणी, जेष्ठाला ४८ लाखांचा ऑनलाईन गंडा

२ कोट ३२ लाखांचा ऑनलाईन गंडा

marathinews24.com

पुणे – स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, अशी फेसबुकवरील जाहिरात वाचून ७३ वर्षीय जेष्ठ नागरिकाला हाव सुटली. त्यांनी संबंधित लिंकला क्लिक केले असता, सायबर चोरट्याने त्यांना दुसरी लिंक पाठवली. तक्रारदार जेष्ठाचा विश्वास संपादित केल्यानंतर विविध बँकखात्याची माहिती पाठवून पैसे पाठवण्यास भाग पाडले. तब्बल २ कोटी ३२ लाख रूपये ऑनलाईनरित्या पाठवल्यानंतर जेष्ठाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तोपर्यंत उशीर झाला होता. सायबर चोरट्याने गंडा घातल्याप्रकरणी तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

फ्लाईंग जिप्सी कॅफेला वठणीवर आणणार-पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी 

शिवाजीनगर भांबुर्डा परिसरातील ७३ वर्षीय नागरिक २५ मे रोजी फेसबुकवर स्क्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना एमएस प्रोट्रेंड या स्टॉक एक्सचेंज कंपनीची जाहिरात दिसली. त्यानंतर जेष्ठाने त्या जाहिरातीवर क्लिक केले असता, संबंधित मोबाईल धारकाने त्यांना फोन केला. स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल, अशी बतावणी केली. त्यानंतर सायबर चोरट्याने तक्रारदाराचे अकाउंट तयार करून घेतले. गुंतवणूकीच्या आमिषाने विविध बँकखाते क्रमांक देउन रक्कम जमा करण्यास सांगितली. २५ मे ते ३० जुलै २०२६ कालावधीत सायबर चोरट्याने तक्रारदाराकडून तब्बल २ कोटी ३२ लाख ५१ हजार रूपये वर्ग करून घेतले. परतावा न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करीत आहेत.

जेष्ठाला १३ लाखांचा ऑनलाईन गंडा

बँक ऑफ इंडियामधून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने पर्वती परिसरातील शिवदर्शनमध्ये राहत असलेल्या ७० वर्षीय नागरिकाला १२ लाख ८५ हजारांचा गंडा घातला आहे. पेन्शन कार्डसाठी केलेल्या अर्जाची तपासणी करण्याचे सांगून माहिती घेतली. त्यानंतर तक्रारदार जेष्ठाच्या कार्डचा अ‍ॅक्सेस घेउन १२ लाखांची रक्कम वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक हिवरकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×