सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या बहाण्याने सायबर चोरट्याने एकाला तब्बल ४१ लाख ७४ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १० जुलै ते ७ सप्टेंबर २०२६ कालावधीत सिंहगड रोडवर घडली आहे. याप्रकरणी मोबाइलधारक, लिंकधारक, बँकखाते धारकाविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कौटुंबिक वादातून मेव्हण्यावर लोखंडी हत्याराने हल्ला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड रोड परिसरात राहायला असून, १० जुलैला सायबर चोरट्याने त्यांच्याशी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने त्यांना अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. सायबर चोरट्याने तक्रारदाराचा विश्वास संपादित केल्यानंतर रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले. अवघ्या दोन महिन्याच्या आतमध्ये सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडून तब्बल ४१ लाख ४७ हजार रुपये ऑनलाईनरित्या वर्ग करुन घेतले. मात्र, त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक समीर गायकवाड तपास करीत आहेत.
तरुण व्यावसायिकाला सव्वा सहा लाखांचा गंडा
सायबर चोरट्याने तरुण व्यावसायिकाला संपर्क साधून विश्वास संपादित केला. ऑर्डर घेण्यास सांगून त्याद्वारे चांगला नफा मिळवून देण्याची बतावणी करीत तब्बल ६ लाख ३१ हजार रुपये पाठवण्यिास भाग पाडले आहे. ही घटना २८ जुलै ते १३ सप्टेंबर कालावधीत कोथरुडमध्ये घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरुणाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक सुनील कारोटे तपास करीत आहेत.





















