Breking News
उपविभागीय कार्यालय बारामती व इंदापूर तहसिल कार्यालयात 9 जूनला लोकअदालतीचे आयोजनइंदापूर येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहनचांडोली येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहनभरदिवसा पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावलेजीवनसाथीवरून झाली ओळख, लग्नाच्या आमिषाने २५ लाखांचा गंडाविभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तिमाही बैठकीचे सोमवारी आयोजनइमारतीच्या पेटिंगचे काम करताना पडला, तरुण पेंटर ठार झालाBike Accident : भरधाव दुचाकी घसरून तरूणाचा मृत्यू, सहकारी जखमीFraud Case Pune : शैक्षणिक संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक करणारा जेरबंदHadapsar Crime News : हडपसर गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी गजाआड

पुणे : वर्दळीच्या मार्केटयार्ड परिसरात वाहतूक बदल

गगणविहार चौक ते वायजंक्शन, गंगाधाम सोसायटी परिसरात नो पार्किंग

Marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती मार्केटयार्ड परिसरातील वाहतूक सुरळित करण्यासाठी गगणविहार चौक ते वायजंक्शन, तसेच गंगाधाम सोसायटीला जोडणारे सर्व प्रमुख रस्ते ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित केले आहेत. आदेशानुसार,गगणविहार चौक ते वाय जंक्शनपर्यंत आणि गंगाधाम सोसायटीच्या हद्दीत येणार्‍या रस्त्यांवर वाहने पार्क करता येणार नाहीत. अस्ताव्यस्थ पार्किंगमुळे वारंवार होणारी वाहतूककोंडी आणि अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

पिस्तुलासह काडतुस बाळगणाऱ्या इसमास बेड्या – सविस्तर बातमी

मेघदूत हॉटेलपासून वर्धमानपुरी सोसायटीपर्यंत सुमारे ६०० मीटरचा भाग ‘नो पार्किंग झोन’ म्हणून घोषित केला आहे. या भागात ‘पी-१’ आणि ‘पी-२’ पार्किंगही लागू केले आहे. १ मे २०२५ पासून आदेश लागू करण्यात येणार असून, नागरिकांनी पार्किंग ठिकाणीच वाहने लावावीत, असे आवाहन वाहतूक पोलिस विभागाने केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित चालकांवर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, निर्णयाची पूर्वसूचना स्थानिक दुकानदारांसह नागरिकांना देण्यात येणार असून, नागरिकांनी मार्केटयार्ड परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top