Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

Fraud Case Pune : शैक्षणिक संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक करणारा जेरबंद

Fraud Case Pune : शैक्षणिक संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक करणारा जेरबंद

कोलकाता विमानतळावर गु्न्हे शाखेची कारवाई

marathinews24.com

पुणे – Fraud Case Pune : शहरातील नामवंत शिक्षण संस्थेत प्रवेशाचे आमिष, तसेच शैक्षणिक संस्थेच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करणाऱ्या पसार आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोलकाता विमानतळावरुन ताब्यात घेतले. पत्नीसह थायलंडला पर्यटनासाठी जात असताना आरोपीला सापळा लावून पोलिसांनी पकडले.

Fraud Case Pune : शैक्षणिक संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक करणारा जेरबंद

हडपसर गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी गजाआड – सविस्तर बातमी 

कुणालकुमार बिरेंद्रकुमार विद्यार्थी असे अटक केलेल्याचे नाव आहे. सेनापती बापट रस्त्यावरील शैक्षणिक संस्थेच्या नावाने बनावट संकेतस्थळा तयार करण्यात आले होते. या संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात २ एप्रिल रोजी आरोपी कुणालकुमार बिद्यार्थी, साथीदार आकाश यादव आणि दिव्या यांच्याविरुद्ध गुन्ह दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना दिल्ली, तसेच हरयाणात शोध घेतला होता.

मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. पोलिसांनी त्यांना दिसताक्षणी अटक करण्याची नोटीस (लूक आऊट नोटीस) बजावली होती. आरोपी बिद्यार्थी मूळचा बिहारमधील असून, त्याच्याविरुद्ध २०२१ मध्ये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालायने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. Fraud Case Pune

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला पकडण्यासाठी पथके तयार केली होती. पुणे, मुंबई, दिल्लीत त्याचा शोध घेण्यात आला होता. त्यानंतर बिद्यार्थी पत्नीसह थायलंडला निघाला असून, तो कोलकाता विमानतळावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने कोलकाता विमानतळ परिसरात सापळा लावून त्याला पकडले.

न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत (५ जून) पोलीस कोटडीत ठेवण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, प्रवीण उत्तेकर, दत्ताराम जाधव, संदीप शिर्के, विशाल दळवी, मारुती पारधी, संदेश काकडे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×