पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक
marathinews24.com
पुणे – पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची तिमाही बैठक सोमवार दिनांक ९ जून रोजी सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन येथे आयोजित करण्यात आली असल्याचे समितीचे सदस्य सचिव तथा महसूल अपर आयुक्त महेश पाटील यांनी कळविले आहे.
प्रत्येक तीन महिन्यातून एकदा त्या महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक घेण्यात येते. या बैठकीत तीन महिन्यांत समितीकडे आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात येतो, असेही पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.