सातारा रस्त्यावरील मोरे बागेजवळील घटना
marathinews24.com
पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १५ हजार रूपयांचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना ३ जूनला सकाळी साडेनउच्या सुमारास सातारा रस्त्यावरील मोरे बागेजवळ घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने तक्रार दाखल करून तपासाला गती दिली आहे. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपीचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जीवनसाथीवरून झाली ओळख, लग्नाच्या आमिषाने २५ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४४ वर्षीय महिला कात्रजमध्ये राहायला असून, ३ जूनला सकाळी साडेनउच्या सुमारास मोरे बागेजवळून पायी जात होती. त्यावेळी परिसरात चोरट्याने त्यांचा पाठलाग करून महिलेचा गळ्यातील १५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटा पसार झाला. दरम्यान, मागील काही दिवसांपासून दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलांचे मंगळसूत्र हिसकावण्याचा सपाटा सुरूच ठेवला असतानाच, आता पादचारी चोरट्यांकडूनही मंगळसूत्र हिसकावून नेले जात आहेत. त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करीत आहेत.