कॉन्ट्रॅक्टरविरूद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – इमारतीच्या गॅलरीत ग्रिलवर उभा राहून रंगरंगोटी करणार्या तरूण पेंटर तोल जाउन खाली पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्याची घटना २० एप्रिलला घडली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. याप्रकरणी संबंधित कॉन्ट्रॅक्टरविरूद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जगतमुरत गुलाब निषाद (वय ३०,रा. केळेवाडी, कोथरुड, मूळ-उत्तर प्रदेश ) असे ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत ज्ञानेश्वर गढई (वय २५,रा. कर्वेरोड) आणि यशवंत प्रभाकर देशपांडे (वय ५३,रा. कर्वेनगर ) यांच्याविरूरद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भरधाव दुचाकी घसरून तरूणाचा मृत्यू, सहकारी जखमी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड परिसरातील रामबाग कॉलनी उमा महेश को- ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत इमारतीच्या पेटिंगचे काम सुरू होते. त्याठिकाणी जगतमुरत गॅलरीच्या ग्रिलवर उभा राहून पेटिंग काम करत असताना, तोल जाऊन खाली पडला. ही घटना २० एप्रिलला घडली होती. याप्रकरणी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान नुकताच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, आरोपी अनिकेत गढई व यशवंत देशपांडे यांनी इमारतीचे पेटिंगचे कॉन्ट्रक्ट घेतले होते. मात्र, त्यांनी कर्मचार्यांच्या सुरक्षेची कोणतीही साधने न वापरता कामगारांना काम करण्यास भाग पाडले. इमारतीच्या गॅलरीच्या ग्रिलवर उभा राहून जगतमुरत ा काम करत असताना त्याचा तोल जाऊन खाली पडला. त्याच्या मृत्युस कारणीभूत झाल्याने आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक आर. आर. आडगळे तपास करीत आहेत.