तरुणाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
marathinews24.com
पुणे – Bike Accident : भरधाव दुचाकीस्वार तरूणाचे नियंत्रण सुटून दुचाकी घसरल्यामुळे झालेल्या अपघातात तरूणाचा मृत्यू झाला आहे. अपघातात त्याचा मित्रही जखमी झाला आहे. हा अपघात ३१ मे रोजी पहाटे चारच्या सुमारास एरंडवण्यातील एसएनडीटी कॉलेजजवळील आठवले चौकात घडला आहे. तन्मय सचिन कळत्रे (वय २१, रा. नंदनवन सोसायटी, कोथरूड) असे Bike Accident अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय डेंगळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शैक्षणिक संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक करणारा जेरबंद – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तन्मय कळत्रे आणि त्याचा मित्र हे ३१ मे रोजी पहाटे चारच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होते. एसएनडीटी कॉलेजजवळील आठवले चौकात भरधाव वेगातील तन्मयचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी घसरून दोघेही खाली पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान तन्मयचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याच्या मित्रावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले तपास क