विमानतळ पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – दुचाकी चोरणार्या सराईताला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख ८० हजारांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. मुनान सत्तार अन्सारी (वय ३४ रा. कलवड वस्ती लोहगाव पुणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सराईताने विमानतळसह मुंबईतून दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे. विमानतळ पोलीस ५ मे रोजी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना कर्मचारी योगेश थोपटे यांना दुचाकी चोरट्याची माहिती मिळाली. लोहगावमधून दुचाकी चोरलेला सराईत हा आर के चौकासमोरील मोकळे मैदानामध्ये थांबल्याची बातमी मिळाली. त्यानुसार तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांच्यासह पथकाने त्याठिकाणी धाव घेतली.
गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या सराईताला अटक, वानवडी पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी
आरोपी मुनान सत्तार अन्सारी याला दुचाकीसह ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच त्याने मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बुलेटही चोरल्याचे सांगितले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आशालता खापरे, एपीआय विजय चंदन, रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे, लालु कर्हे, गिरीष नाणेकर, रुपेश तोडेकर यांनी केली.