सहकार्याचा प्रताप विमानतळ परिसरातील घटना
marathinews24.com
पुणे – कंपनीत वॉशरूमला गेलेल्या महिला सहकारी तरूणीचा पाठलाग करून तरुणाने तिच्या कम्पार्टमेंटमध्ये डोकावून पाहत लज्जा उत्पन्न केली आहे. ही घटना २६ एप्रिलला विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कंपनीत घडली आहे. याप्रकरणी संबंधित २३ वर्षीय तरूणीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अनिल (वय २५, रा. मांजरी बुद्रूक) याच्याविरूद्ध नोटीस बजावली आहे.
जुन्या भांडणाच्या रागातून दोघा भावंडावर वार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणी आणि आरोपी अनिल एकाच कंपनीत कामाला असून, २६ एप्रिलला तरूणी वॉशरूम कम्पार्टमेंटमध्ये गेली होती. त्यावेळी आरोपीही तिच्या पाठीमागे गेला. बाजूची लाईट बंद असलेल्या कम्पार्टमेंटमध्ये शिरून तो लपून बसला. त्यानंतर त्याने लेडीज वॉशरूममध्ये डोकावून पाहत तरूणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याप्रकरणी तरूणीला वॉशरूममध्ये कोणीतरी आल्याचे जाणवताच तिने आरडाओरड केली. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करीत आहेत.
शीतपेयात गुंगीच्या औषधातून अत्याचार, व्हिडिओ रेकॉडिंगही केले
शीतपेयातून गुंगीचे औषण मिसळून तरूणीवर अत्याचार केल्याची घटना २८ ऑक्टोबर २०२४ मध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपीविरूद्ध २६ एप्रिलला लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरूणी नंदेच्या घरात असताना तिच्या प्रियकराने पीडितेला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करीत व्हिडिओ रेकॉडिंग केले. घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वंजारी तपास करीत आहेत.