Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

येरवडा कारागृहात महिला कैद्यांसाठी ‘रेडिओ तरंग’

कैदी महिलांच्या मानसिक स्वास्थ्याला दिलासा देणारा उपक्रम

marathinews24.com

पुणे – आयुष्यात होणाऱ्या चुका, अपराधांची शिक्षा भोगावी लागते. कारागृहातील आयुष्यात बाह्य जगताशी संपर्क तुटतो. विशेषत: महिला कैदी कारागृहात एकाकी पडतात. त्यांच्या आयुष्यात आनंद, तसेच नवी उमेद देण्यासाठी कारागृह प्रशासनाने येरवड्यातील महिला कारागृहात महिला कैद्यांसाठी ‘रेडिओ तरंग’ हा कक्ष सुरू केला आहे.

कोंढव्यात पकडलेल्या संशयित दहशतवाद्याच्या मोबाइलमध्ये पाकिस्तानी क्रमांक – सविस्तर बातमी

‘कक्षाच्या माध्यमातून महिला कैद्यांना नामवंत वक्त्यांची भाषणे, योगविषयक मार्गदर्शन, मनोरंजनासाठी गाणी, भक्तिगीते, महिला सक्षमीकरण, कायदेविषयक माहिती देण्यात येणार आहे. संबंधित कक्षाचे उद्घाटन किरण बेदी यांच्या हस्ते झाले. राज्यात भायखळा आणि येरवड्यात महिलांसाठी स्वतंत्र कारागृह आहे. भायखळ्यानंतर येरवड्यातील कारागृहात महिला कैद्यांसाठी ‘रेडिओ तरंग’ कक्ष सुरू करण्यात आला आहे. हा कक्ष सुरू करण्यासाठी इंडिया व्हिजन फाउंडेशनकडून विशेष सहकार्य करण्यात आले’, अशी माहिती येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, महिला कारागृहाच्या अधीक्षक पल्लवी कदम यांनी दिली.

‘येरवड्यातील पुरुषांच्या कारागृहात २०१४ मध्ये ‘प्रिझन कम्युनिटी रेडिओ’ उपक्रमांतर्गत ‘रेडिओ तरंग’ कक्ष सुरू करण्यात आला होता. मुंबईतील भायखळा येथील महिला कारागृहात हा कक्ष सुरू करण्यात आला होता. मात्र, येरवड्यातील महिला कारागृहात रेडिओ कक्ष नव्हता. हा कक्ष सुरू करण्यासाठी इंडिया व्हिजन फाउंडेशनने सहकार्य केले,’ असे त्यांनी नमूद केले.

‘रेडिओ तरंग’ या कक्षाचे उद्घाटन निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी, इंडिया व्हिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष किरण बेदी यांच्या हस्ते करण्यात आले. डाॅ. सुधाकर शेट्टी, गोविंद सिंग, मोनिका धवन, सायना भरुचा, हीना कुरेशी, अमित यादव, धीरज गुप्ता, वैभवी मनुकर, हर्षदा मोडक, रिया खंदुरी उपस्थित होते. कारागृह आणि सुधारसेवा विभागाचे महानिरीक्षक, अतिरिक्त पोलीस महासंचालक डाॅ. सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, महिला कारागृहाच्या अधीक्षक पल्लवी कदम, अतिरिक्त अधीक्षक माया धुतुरे, कारागृह अधिकारी निर्मला बांदल, भाग्यश्री गवळी यांनी रेडिओ कक्ष सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.

महिला कैद्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण

राज्यात भायखळा आणि येरवड्यात स्वतंत्र महिला कारागृह आहेत. येरवड्यातील महिला कारागृहात सध्या ३०० कैदी (बंदी) आहेत. त्यांपैकी १०० महिला कैद्यांना शिक्षा झालेली आहे. उर्वरित महिला न्यायाधीन बंदी आहेत. त्यांना अद्याप शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. ‘रेडिओ तरंग’ कक्षामुळे कारागृहातील महिलांनी आनंद व्यक्त केला आहे. महिलांच्या फर्माईशीनुसार भक्तिगीते, मनोरंजनात्मक गीते, तसेच कायदेविषयक योजनांची माहिती देण्यात येते, अशी माहिती कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×