Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पुण्यात पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पबमधील पार्टीवर छापा

पुण्यात पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पबमधील पार्टीवर छापा

उत्पादन शुल्क विभागाची विमाननगर भागात कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरातील विमाननगर भागातील पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (स्टेट एक्साईज) रविवारी (दि.२८) पहाटे छापा टाकला. पबमध्ये बेकायदा पार्टी सुरू असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने मद्यधुंद ५२ तरुण-तरुणींना ताब्यात घेतले. कारवाईत मद्याच्या १७८ बाटल्या, ध्वनीवर्धक यंत्रणा, तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आला. पबमध्ये बेकायदा हुक्का पार्लर चालविण्यात येत असल्याचे उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.

अवैध गौण खनिज माफियांचे थेट केज प्रशासनालाच आव्हान – सविस्तर बातमी 

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरातील पब, रेस्टाॅरंटमध्ये पार्टीचे आयोजन केले जाते. पब, रेस्टाॅरंटमधील पार्टीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. पब चालकाने पार्टी आयोजनासाठी परवानगी घेतली नव्हती. बेकायदा पार्टीचे आयोजन केल्याप्रकरणी पब चालकासह १० जणांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विमानतळ रस्त्यावर पब आहे. पहाटे पाचपर्यंत पबमध्ये बेकायदा पार्टी सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानंतर पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी पबमध्ये तरुण-तरुणी मद्यप्राशन करताना आढळून आले. पथकाने पबमधून मद्याच्या बाटल्या, ध्वनीवर्धक यंत्रणा, तसेच अन्य साहित्य असा ३ लाख रुपये ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पबमध्ये बेकायदा हुक्का पार्लर

पबमध्ये हुक्का पार्लर चालविण्यात येत असल्याचे उघडकीस आले. बेकायदा हुक्का पार्लर चालविल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे, उपअधीक्षक सुजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जितेंद्र पाटील, संदीप कदम, सचिन श्रीवास्तव, दुय्यम निरीक्षक चरणसिंग कुंठे, विनोद शिंदे, रोहित माने आणि पथकाने ही कारवाई केली.

हरयाणातून महागड्या मद्याची तस्करी; ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

हरयाणातून महागड्या मद्याची (स्काॅच) तस्करीचा प्रकार उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला. या कारवाईत टेम्पो, मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी हरयाणातील पाच जणांना अटक करण्यात आली. नाशिक – पुणे महामार्गावर खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक परिसरात ही कारवाई करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×