सुसंस्कार हायस्कूल, माझी शाळा येथे शाहू जयंती साजरी
marathinews24.com
कोल्हापूर – “राजर्षी शाहू महाराज प्रजावत्सल, दिनदलीतांचे तारणहार,समतचे पुरस्कर्ते व कर्ते समाजसुधारक होते..!” असे प्रतिपादन डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांनी केले, सुसंस्कार शिक्षण मंडळ कोल्हापूर संचलित सुसंस्कार हायस्कूल, माझी शाळा, अभिनव बालक मंदिर, राजर्षी शाहू वाचनालय यांच्या संयुक्तपणे कदमवाडी भोसलेवाडी आयोजित राजर्षी शाहू जयंतीनिमित्त ‘राजर्षी शाहू महाराज आभाळा एवढा महापुरुष ’ याविषयावर डॉ. सरनाईक यांचे व्याख्यान झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक वसंत पाठक होते.
मान्सून काळात बांधकाम कामगारांची काळजी घेण्याचे आवाहन – सविस्तर बातमी
डॉ.सुनीलकुमार सरनाईक म्हणाले, जातपात, धर्म लिंग, गरीब श्रीमंत, शिक्षित अशिक्षित असा कोणताही भेदभाव न करता सर्व थरातील जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. प्रसंगी ब्रिटीश सरकारचा रोष पत्करून धेर्याने त्यांनी आपल्या संस्थानात सामाजिक व धार्मिक गुलामगिरी मोडून काढण्याचा जणू विडाच उचलला होता.”
यावेळी सुसंस्कार शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रियाज मगदूम, सचिव सौ.रुबिना अन्सारी, भरत लाटकर, बाळासाहेब गवाणी पाटील, नंदकुमार डोईजड, आनंदा यादव, डॉ. अब्दुलखालीक खान, सौ.शबाना खान, सौ.जकिया मगदूम, सुसंस्कार हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय भोगम, माझी शाळेचे मुख्याध्यापक एम. बी.जमादार, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विदयार्थी उपस्थित होते.
यावेळी शाहू पुरस्काराचे मानकरी वसंत पाठक, पीएचडी मिळवल्याबद्दल तसेच गोविंद पानसरे पुरस्काराचे मानकरी डॉ. सुनीलकुमार सरनाईक, ॲड. ऋषिकेश ठोकळे, शमा नाईक, रणवीर जाधव, तसेच मार्च 2025 मध्ये एस.एस.सी. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सुरवातीला गीतमंचच्या विदयार्थ्यांनी शाहू गीत गायन केले, त्यास भगवान कांबळे यांनी हार्मोनियमची साथ दिली. झांज पथकाच्या वादयासह कदमवाडी भोसलेवाडी भागातून रॅली काढण्यात आली.
रॅलीवेळी बालचम्मूनी राजर्षी शाहू यांची वेशभूषा केली होती. राजर्षी शाहू प्रतिमेस डॉ. सुनीलकुमार सरनाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दिवंगत अखलाक अन्सारी व सेवक आशपाक मगदूम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सुत्रसंचलन गुलाब आत्तार, स्वागत प्रास्ताविक सागर पाटील, पाहुणे परिचय संजय कळके तर आभार गजानन गुरव यांनी मानले.