पुण्यात एमडी विक्री रॅकेटचे राजस्थान कनेक्शन

६ जणांना अटक; ४ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

पुणे – पोलिसांनी मॅफेड्रॉन एमडी विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले असून, याप्रकरणी राजस्थानमधून आतापर्यंत ६ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ कोटी ९२ लाखांचे एमडी, ३५ लाखांचे मोबाइल, अलिशान मोटार असा ४ कोटी २७ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सोमय मुंडे, निखील पिंगळे यांच्या पथकाने ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम – सविस्तर बातमी

मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २८, रा. वाघोली) हरीष सुजनाराम देवासी (वय २२ रा. वाघोली)योगेश उर्फ मनीष बाबुराम बिष्णोई (वय ३०, रा. राजस्थान) सचिन उर्फ एस के रमेशकुमार बिष्णोई (वय २० रा. जोधपूर, राजस्थान) अमित सुनील घुले (वय ४० रा. मांजरी बुद्रूक, हडपसर)रतनलाल किष्णाराज जाठ (वय २०, रा. बालोतरा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पेट्रोलिंगवेळी खराडीतील ईहॉन फेजदोनजवळ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून २७ ग्रॅम एमडी आणि इतर साहित्य असा १२ लाख ४१ हजारांचा ऐवज जप्त केला होता. याप्रकरणी पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी कसून तपास करण्याचे आदेश दिले होते.

एमडी विक्रीचे रॅकेट केले उध्वस्त

आरोपी मोतीसिंहकडे केलेल्या चौकशीत दुसरा ड्रग्जतस्कर योगेश उर्फ मनीष राजस्थानमधून एमडी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ७ फेबु्रवारीला वाघोलीतून योगेशला ताब्यात घेत १५१ ग्रॅम एमडीसह ३० लाख २८ हजारांचा ऐवज जप्त केला. तांत्रिक तपासानुसार सचिन बिष्णोईला पोलिसांनी हडपसरमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ लाख ६५ हजारांचे एमडी जप्त केले. मांजरी बुद्रूकमधील एमडी विकत घेणारा अमित घुले यालाही अटक केली. त्याच्याकडून अलिशान मोटारीसह ८० लाखांचे एमडी असा १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर पथकाने राजस्थानात धाव घेत मुख्य एमडी वितरक रतनलाल जाठ याला अटक करीत त्याच्याकडून २ कोटी ७७ लाखांचा ऐवज जप्त केला.

एमडी विक्रीत सक्रिय असलेला आणि पुण्यातून पसार झालेला आरोपी रामकरण जाट उर्फ चौधरी उर्फ सियाग रा. जोधपूर, राजस्थान याला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून एकूण १ हजार ९६० ग्रॅम एमडी, मोबाइल, अलिशान गाड्या असा ४ कोटींवर ऐवज जप्त केला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलसी निरीक्षक पंडीत रेजितवाड, एपीआय रवींद्र गोडसे, एपीआय नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक राहूल कोळपे, श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, सचिन पाटील, सुरेंद्र साबळे, नीलम कर्पे, साहेबराव गुंडाळे, प्रवीण गव्हाणे यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×